चिमण्या परत फिरतील का?
काही घटना , काही गोष्टी अगदी मनाला जाऊन भिडतात. काही गीते तर हमखास हृदयाला हेलावून टाकतात. याचाच प्रत्यय मला काल आला. ऑफिसमध्ये कामातून थोडी उसंत मिळाली असता मोबाईलवर सहज म्हणून आठवणीतील गाणी ऐकत होतो. त्यावेळी 'जिव्हाळा' चित्रपटातील गीतकार महाकवी ग.दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेलं ' या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या...' हे गीत ऐकलं. या गीतात गदिमा नी लिहिलेले शब्द आपल्या हृदयाचा ठाव घेतल्यावाचून रहात नाहीत. आपल्या लेकरांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या व्याकूळ आईचे हृदयस्पर्शी शब्द गदिमांनी लिहिले आहेत. या गीताच्या शेवटच्या ओळी ' या बाळांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या' या ओळी मनातल्या मनात पुन्हा पुन्हा गुणगुणत टेबलावर आलेल्या बातम्या करू लागलो. मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं. संध्याकाळी उशीर झाला म्हणून घरी धावत सुटलो असताना दारात उभी असलेली वाट पाहणारी आई दिसली, आणि पुन्हा पुन्हा "वाट अंधारल्या" या ओळी डोक्यात घोळू लागल्या. या विचारात असतानाच लातूर जिल्ह्यातील एक बातमी नजरेसमोर आली. बातमी तशी हल्लीच्या रुटीनचीच होती. परंतु खरोखरच "वाटा अंधारल्या"ची जाणीव करून देणारी होती.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धश्रमात चार वर्षांपूर्वी रहायला आलेल्या डॉ. अरुण गोधमगावकरांचे 18 ऑगस्ट रोजी निधन झाले. आता यात नवीन काय, असे आपणास वाटेल. डॉ. गोधमगावकर यांना मी व्यक्तिशः ओळखत नाही, की त्यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही. परंतु त्यांच्या निधनावेळची स्थिती वाचून मी अस्वस्थ झालो. ज्या चिमण्यांच्या पंखात या डॉक्टर दाम्पत्याने आशेचे बळ भरले होते ती पाखरे आज त्यांच्या घरट्यातून तर निघाली होतीच, परंतु आयुष्याच्या सांजवेळी आर्त हाका मारूनही ती घराकडे परतायला तयार नव्हती. शेवटी संस्था चालकांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडत डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नायगाव तालुक्यातील गोधमगावचे रहिवासी असलेले डॉक्टर एक नामांकित बालरोगतज्ज्ञ होते. अत्यंत कठीण दिवस काढून त्यांनी शिक्षण घेतले होते. आपल्या वाटेल आलेल्या हाल अपेष्टा आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी स्वतः कष्ट उपसत मुलाला एम. डी. केले. तसेच मुलीला स्त्री रोगतज्ज्ञ केले. त्यानंतर त्यांनी सून आणि जावई ही डॉक्टरच बघून मुलामुलींचे लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर पती पत्नीला फार आनंद झाला. हळूहळू कुटुंब वाढू लागले. डॉक्टरांना नातवंड झाली,जो तो आपापल्या संसारात रमला. आता मात्र मुलामुलीला आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. अशाच एके दिवशी डॉक्टरांच्या पत्नीचे निधन झाले, हे समजूनही मुलगा मुलगी आईच्या अंत्यसंस्काराला आली नाहीत. डॉक्टरांना खूप वाईट वाटले.
त्यानंतर डॉक्टरांनी सगरोली येथील सैनिक स्कुल मधील रुग्णालयामध्ये काही काळ सेवा केली. मात्र वयानुसार काम झेपेनासे झाल्यावर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धश्रमात आपला मुक्काम हलवला. तेथे चार वर्षे राहिल्यानंतर अखेर वृद्धापकाळाने त्यांचे 18 ऑगस्टला निधन झाले. नियमाप्रमाणे वृद्धश्रमाच्या संचालकांनी अमेरिकेतील मुलांना कळवले. मात्र आम्हाला सध्या यायला मिल नार नाही असे सांगून तुम्हीच अंत्यविधी आटोपून घ्या, असा निरोप दिला. डॉक्टर गेले, त्यांनी केलेली रुग्णसेवा तेवढी मागे राहिली.
डॉक्टरांचा मृत्यू सर्वसामान्यांसारखाच होता. परंतु त्याने अनेक प्रश्नांना जन्म दिला होता. डॉक्टरांच्या मृत्यूने नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या अशा वर्तनाने मी अस्वस्थ झालो. का वागली असतील ती मुले अशी? खरंच आई वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी ही त्यांच्याकडे वेळ नसेल का? पैसा मिळवण्यासाठी माणूस इतका प्रॅक्टिकल होतो? काय कमी केले असेल त्या आई वडिलांनी? आपण मुलांच्या पंखात बळ दिलं ते भरारी घेण्यासाठीच ना? मग याच पंखाच्या आधारे आकाशात उंच उंच जाताना या पिलांना घरट्या चा विसर का बरे पडला? असा प्रश्न त्या आईवडिलांच्या आत्म्याला पडला असेलच ना? मुलांनी आपल्या वृद्ध आलं वडिलांना का त्यागावं? त्यांच्या उतार वयात त्यांची काठी बनून रहावं हे त्याचं कर्तव्य नाही का? की सर्व जबाबदारी समाजावर सोपवून मोकळं व्हायचं? अशा अनेकविध प्रश्नांचं ओझं डोक्यावर घेऊनच ऑफिसच्या पायऱ्या उतरू लागलो.
- शशांक सिनकर